खुशखबर : या आठवड्यातला रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द!

हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे महत्त्वाच्या कामासाठी आखलेला ७२ तासांचा जंबो ब्लॉक रेल्वेने गुंडाळलाय. 

Updated: Feb 11, 2016, 10:48 PM IST
खुशखबर : या आठवड्यातला रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द!

मुंबई : हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा चालवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे महत्त्वाच्या कामासाठी आखलेला ७२ तासांचा जंबो ब्लॉक रेल्वेने गुंडाळलाय. 

१२, १३ आणि १४ फेब्रुवारी दरम्यान हा मेगाब्लॉक होणार होता. परंतु, याचदरम्यान मुंबईत ‘मेक इन इंडिया’ हा भव्य कार्यक्रम होतोय. 

या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात उपस्थित असताना ७२ तास हार्बर मार्गाची वाहतूक बंद ठेवायची का? असा प्रश्न रेल्वेला पडल्यानं हा ब्लॉक रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते अशा कोणत्याही ब्लॉकचं नियोजन रेल्वेनं केलंच नव्हतं.