गणपती उत्सव : राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

 गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत महिला छेडछाड विरोधी पथकासह ४४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लालबाग राजा कार्यकर्त्यांना नीट वागण्याची पोलीस आयुक्तांची तंबी दिली आहे.

Updated: Aug 29, 2014, 09:20 AM IST
गणपती उत्सव : राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त title=

मुंबई : गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत महिला छेडछाड विरोधी पथकासह ४४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लालबाग राजा कार्यकर्त्यांना नीट वागण्याची पोलीस आयुक्तांची तंबी दिली आहे.

चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे गणपती.. सा-यांचा लाडका बाप्पा. गणरायाचं वाजत गाजत आगमन झालंय. आसंमतांमध्ये मोरयाचा गजर घुमू लागलाय. गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलंय..  हा आनंदोत्सव पुढील दहा दिवस उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. भक्तांचं दुःख निवारण करावं हीच आजच्या दिवशी मनोकामना.

आज गणेशचतुर्थी. घराघरात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आज केली जाईल. दीड दिवसांपासून ते 10 दिवसांपर्यंत हा हवाहवासा वाटणारा पाहुणा आपल्या घरात असेल. पुढलं वर्षं सुखा-समाधानाचं जावं यासाठी त्याची मनोभावे पूजा केली जाईल. त्याला प्रसाद अर्पण केला जाईल. शास्त्रानुसार गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त नेमका कोणता आहे हे जाणून घेतले आहे. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले सकाळपासून दुपारी 1.40 वाजेपर्यंत मुहूर्त आहे.

गणेश गल्लीत मुंबईच्या राजाची सकाळीच प्राणप्रतिष्ठा झाली. दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच रांग लावलीय. गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची मोठ्या थाटामाटात प्राणप्रतिष्ठा करण्यात आलीय. भाविकांनी सकाळपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय. घरगुती आणि सार्वजनिक गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. दीड दिवसांपासून 10 दिवसांसाठी हवाहवासा पाहुण्याचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. आज दुपारी 1.40 पर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहुर्त आहे.

आकर्षक देखावे आणि भव्य मूर्तींचं मुंबईकरांना दर्शन पाहायला मिळणार आहे. गोरेगावमध्ये साकारला चॉकलेचा बाप्पा तर बर्फाचा आणि टिश्यू पेपरचे गणरायही मुंबईचं आकर्षण ठरत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.