मुंबई : किडनी रॅकेट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिरानंदानी हॉस्पिटलच्या ५ डॉक्टरांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पवईतील हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेट सक्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल ५ डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या पाच डॉक्टरांना अंधेरीतील न्यायालयाने बुधवारी १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केलेले पाच डॉक्टर हे हिरानंदानी रुग्णालयात कार्यरत होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित चटर्जी, वैद्यकिय संचालक अनुराग नाईक, डॉ. प्रकाश शेटे, डॉ. मुकेश शेटे, डॉ. मुकेश शहा आणि प्रकाश शेट्टी यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात मूत्रपिंड विकले जात असल्याचा प्रकार पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता.