मुंबईत ११ ठिकाणी होणार होते बॉम्बस्फोट

मुंबईतील ११ महत्त्वाच्या ठिकाणी एकाच वेळी बॉम्बस्फोट घडविण्याचा महाभयंकर कट इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती दहशतवादी यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर यांच्या चौकशीतून समोर आली असल्याचे एका आघाडीच्या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 26, 2013, 01:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील ११ महत्त्वाच्या ठिकाणी एकाच वेळी बॉम्बस्फोट घडविण्याचा महाभयंकर कट इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने रचला होता, अशी धक्कादायक माहिती दहशतवादी यासिन भटकळ आणि त्याचा साथीदार असादुल्ला अख्तर यांच्या चौकशीतून समोर आली असल्याचे एका आघाडीच्या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
विशेष म्हणजे हा कट निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी भटकळ आणि अख्तर यांनी त्या ११ ठिकाणांची ऑगस्ट महिन्यात रेकीही केल्याचे तपासात उघड झाल्याने संपूर्ण पोलीस खाते हादरले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर मुंबई पोलिसांनी मुंबईतील अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था कडेकोट केली आहे.
एएटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांच्या सहीने तयार करण्यात आलेल्या एका गोपनीय अहवालामुळे या भयंकर कटाची माहिती समोर आली आहे.
कोणती होती ११ ठिकाणे
मुंबादेवी मंदिर, झव्हेरी बाजार, काळबादेवी, मंगलदास मार्केट, लोहार चाळ, क्रॉफर्ड मार्केट, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, मुंबई सेंट्रल बस डेपो, पोलीस आयुक्तालय, एटीएसच्या मुख्यालयाजवळील मेगन डेव्हीड सिनगॉग, आग्रीपाड्यातील मेगन हस्सीदीन सिनगॉग, डोंगरी येथील शारे रासन सिनगॉग, पायधुनी येथील शार हराहमीम सिनगॉग ही चार उपासना स्थाने.
पुन्हा ज्यू उपासना केंद्रे
ही ठिकाणे सहज टप्प्यात येण्याजोगी असल्यानेच ती मुजाहिदीनने हल्ल्यासाठी निवडली होती. ‘२६/११’च्या हल्ल्यावेळी कुलाबा इथल्या ज्यू धर्मीयांच्या ‘नरीमन हाऊस’ या इमारतीलाही टार्गेट करण्यात आले होते. तशाच हल्ला ज्यूंच्या नागपाडा, आग्रीपाडा, डोंगरी आणि पायधुनी येथे करण्याचे ठरवले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.