मुंबईसह उपनगरात मुसळधार, भिंत कोसळून 5 जखमी

शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. नालासोपारा भागात काल रात्री भिंत कोसळली. त्य़ामुळे एकाच कुटुंबातले पाच जण जखमी झाले. 

Updated: Jul 11, 2014, 09:02 PM IST
मुंबईसह उपनगरात मुसळधार, भिंत कोसळून 5 जखमी title=

मुंबई : शहर आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. नालासोपारा भागात काल रात्री भिंत कोसळली. त्य़ामुळे एकाच कुटुंबातले पाच जण जखमी झाले. 

नालासोपारा भागातील जी भींत कोसळली ती अनधिकृत होती आणि त्याविषयी नागरिकांनी अनेकदा तक्रारीही केल्या होत्या तर वडाळ्याच्या सहकार नगर भागात झाड कोसळलं. मुंबईतल्या पावसाने अनेक भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे अनेक भागात वाहतूक कोंडी झाली होती. 

नालासोपारामधील जखमींना मीरारोड इथल्या उमराव हॉस्पिटलमध्ये आणि वसईच्या कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. शिर्डीनगर भागात रात्री साडेदहाच्या सुमाराला बी. एन. मेमोरियल हायस्कुलची भींत ओम शांतीधाम चाळीवर पडली. ४० वर्षीय जगदीश मिश्रा, ३५ वर्षीय अर्चना, १० वर्षीय अंकित, ८ वर्षीय वर्षा आणि ५ वर्षीय अंशू अशी जखमींची नावं आहेत.
 
पावसाने नवी मुंबईतल्या एपीएमसी, तुर्भे आणि सीबीडीच्या सखल भागांत पाणी साचलं होतं. पनवेल सह संपूर्ण नवी मुंबई परिसरात रात्रीपासूनच संततधार सुरु होती. सीएसटी ते पनवेल हार्बर मार्गावरची वाहतूक उशीराने होत होती. तर पावसामुळे सायन पनवेल मार्गावरची तसंच शहरातली वाहतुक धीम्या गतीनं सुरु होती. सकाळी आठ ते ११ वाजेपर्यंत ५४.२ मिमी पावसाची नोंद झालीय.

मुंबईत मुसळधार पावसामुळे दादर, परळ, एल्फिन्स्टन भागात पाणी साचलंय. परळ रेल्वे स्टेशनजवळ तर तळ साचल्यासारखी परिस्थिती होती. रात्रभऱ सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलं. या पावसामुळं नेहमीप्रमाणे सर्व वाहतुकींचा बोजवारा उडाल्याय. त्यामुळं मुंबईकरांची दैना झाली. 

ऐन कार्यालयीन वेळात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली तर हार्बरची वाहतूक ठप्प झाल्यामुळं चाकलमान्यांचे चांगलेच हाल झाले. तब्बल तीन ते चार तासांनंतर दोन्ही मार्गांवरली वाहतूक आता सुरळीत झाली असून लोकल्स १५ ते २० मिनिटे उशिरानं धावत आहेत. तर रस्ते वाहतुकीबाबतही हेच चित्र मुंबईत पाहायला मिळाल. 

मुंबईतल्या आंबेडकर रस्त्यावर परेल टीटी आणि हिंदमाताच्या पुलाखाली गुडखाभर पाणी साचलं. त्यामुळं पुलाखालून जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. तर पश्चिम महामार्गावर वाहतुकीचीही कोंडी झाली होती. एलबीएस मार्गावरची वाहतुकही काही काळ धीम्या गतीनं सुरू होती. यामुळं मात्र मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे दावे फोल ठरलेयत. यंदा पावसानं पुरेशी उसंत देऊनही नेहमीच्या भागांत पाणी साचण्याची परंपरा कायम राहिलीय. महापौरांनी मात्र समुद्राला भरती आल्यामुळं रस्त्यांवर पाणी साचल्याचा दावा केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.