मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांनी कलिना येथील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारत बांधकाम कंत्राटात भ्रष्टाचार केल्याची तक्रार होती, या तक्रारीत एसीबीला तथ्य आढळले आहे.
उघड चौकशीतून या प्रकरणी पुरावे हाती आल्यानंतर सोमवारी एसीबीने भुजबळ यांच्यासह बांधकाम विभागातल्या पाच तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला; मात्र त्यांना तूर्तास अटक होण्याची शक्यता नाही.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता भाजपाच्या टार्गेटवर असलेल्या अन्य नेत्यांचे काय होणार, याबाबत उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.