पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार?

आधीच मुसळधार पावसानं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक शॉकिंग बातमी... वरळी कोळीवाड्याजवळच्या क्लिव्ह लॅंड पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झालाय. 

Updated: Jun 19, 2015, 06:51 PM IST
पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड, समुद्राचं पाणी शहरात घुसणार? title=

मुंबई : आधीच मुसळधार पावसानं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक शॉकिंग बातमी... वरळी कोळीवाड्याजवळच्या क्लिव्ह लॅंड पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड झालाय. 

दगड घुसल्यानं पंपिंग स्टेशनच्या दरवाजांमध्ये बिघाड झालाय. त्यामुळं समुद्राचं पाणी शहरात घुसण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, अवघ्या चार दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पंपिंग स्टेशनचं उद्घाटन झालं होतं.

यावेळी पावसाळ्यात पाणी साठून मुंबई जलमय होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र, अवघ्या चारच दिवसात हे सगळे दावे मुसळधार पावसात वाहून गेलेत. 

दरम्यान, हा बिघाड नेमका कशामुळं झाला, याची चौकशी करण्याचे आदेश शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलेत.

रात्रीपासून बरसणारा जोरदार पाऊस... त्यातच दुपारी अडीच वाजता समुद्रात आलेली मोठी भरती... यामुळे आधीच तुंबापुरीचा अनुभव घेत असलेल्या मुंबईकरांच्या चिंतेत यामुळे चांगलीच भर पडली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.