मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणारी AC लोकल अशी असेल

मुंबईकरांना सतत हूल देणारी वातानुकुलित गाडी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. या AC लोकलचा फर्स्टलूक भन्नाट आहे.

Updated: Feb 13, 2016, 10:02 AM IST
मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणारी AC लोकल अशी असेल

मुंबई : मुंबईकरांना सतत हूल देणारी वातानुकुलित गाडी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. या AC लोकलचा फर्स्टलूक भन्नाट आहे. एसी रॅक, गडद इंडिगो आणि स्टील ग्रे रंग, पारंपरिक पांढरा आणि वांगी सिमेन्स रंगात ही नवी गाडी दिसणार आहे.

मुंबईकरांचा उपनगरीय रेल्वे प्रवास आल्हाददायक आणि वातानुकुलित व्हावा, यासाठी वातानुकुलित उपनगरीय गाडीची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पात दोन वर्षांपूर्वीच झाली होती. मात्र प्रत्यक्ष वातानुकुलित गाडी कधी दाखल होणार, याची प्रतीक्षा मुंबईकरांना आजही आहे.

या गाडीची बांधणी सुरु आहे. पुढील दोन ते अडीच महिन्यांत वातानुकुलित गाडी मुंबईत धावण्याची शक्यता आहे.