देवेंद्र सरकारची अग्निपरीक्षा आणि तीन पर्याय

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमताच्या अग्निपरिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 

Updated: Nov 10, 2014, 08:59 AM IST
देवेंद्र सरकारची अग्निपरीक्षा आणि तीन पर्याय title=

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमताच्या अग्निपरिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 

शिवसेनेने विरोधी बाकांवर बसण्याचे संकेत दिले आहेत, यामुळे शिवसेनेची सत्तेत सहभागी होण्याची शक्यता धुसर झाली आहे. राष्ट्रवादीने मतमोजणीच्या दुसऱ्याचं दिवशी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचं जाहीर केलं, आणि शिवसेनेची हवा काढून घेतली, तर यानंतर दुसऱ्याचं दिवशी शिवसेना+राष्ट्रवादी+काँग्रेस असा नवा फॉर्म्यूला सांगून राष्ट्रवादीने भाजप नेत्यांची अस्वस्थता वाढवली.
 
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातील सहभाग टाळून शिवसेनेने भाजपला ४८ तासांचं अल्टीमेटम दिलं आहे. भाजपाने राष्ट्रवादीबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेने 48 तासांचं अल्टीमेटमही दिलं आहे. 
 
तीन दिवस चालणाऱ्या विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून, विधानसभा अध्यक्षाची निवडही करण्यात येईल. तसेच विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळात आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल.
 
देवेंद्र फडणवीस सरकारची अग्निपरीक्षा
 
पहिला पर्याय
राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा
भाजप १२२+ राष्ट्रवादी ४१ = एकूण १६३
-----------------------------
बहुमताचा आकडा १४४

*****************************
दुसरा पर्याय
शिवसेनेने पाठिंबा दिल्यास
भाजप १२२ + शिवसेना ६३ = एकूण १८५
----------------------------
बहुमताचा आकडा १४४

*****************************
तिसरा पर्याय 
राष्ट्रवादी गैरहजर राहिल्यास
भाजप १२२ + अपक्ष,इतर ०९ = एकूण १३१
-----------------------------
बहुमताचा आकडा १२४

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.