काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेतेपदी कोण असणार?

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेते निवडण्यासाठी काँग्रेस आमदारांची थोड्याच वेळात बैठक विधानभवनात होत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या बैठकीत आमदारांची नाराजी समोर येण्याची चिन्हं आहेत. कोणाची निवड होणार याची उत्सुकता आहे.

Updated: Nov 6, 2014, 03:06 PM IST
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेतेपदी कोण असणार? title=

मुंबई : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेते निवडण्यासाठी काँग्रेस आमदारांची थोड्याच वेळात बैठक विधानभवनात होत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर होणाऱ्या या बैठकीत आमदारांची नाराजी समोर येण्याची चिन्हं आहेत. कोणाची निवड होणार याची उत्सुकता आहे.

निवडणुकीतील पराभवाला काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि काही आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे या बैठकीतही पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधातील नाराजी समोर येण्याची चिन्हं आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून पुढे आले तर त्याला आमदारांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्यतिरिक्त पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. तर तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय झाला तर अमित देशमुख यांचे नाव पुढे येऊ शकते असं बोललं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.