मुंबई पालिकेला दणका, राज्य सरकाने आरे विकासाचा प्रस्ताव हाणून पाडला

आरे कॉलनीचा भाग जादा FSI देत विकसित करण्याच्या मुंबई महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने हाणून पाडला आहे.

Updated: Feb 20, 2015, 12:44 PM IST
मुंबई पालिकेला दणका, राज्य सरकाने आरे विकासाचा प्रस्ताव  हाणून पाडला title=

मुंबई : आरे कॉलनीचा भाग जादा FSI देत विकसित करण्याच्या मुंबई महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने हाणून पाडला आहे.

३००० एकर आरे कॉलनीचा भाग हा नो डेव्हल्पमेंट झोन म्हणजेच ना विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी इमारती व्यतिरिक्त इथे कुठलीही बांधकाम करता येणार नसल्याचं निर्णयात म्हंटल आहे. यामुळे मुंबई उपनगरातील आरे कॉलनी परिसरामधील वनराई आणि या भागातील जंगल टिकून रहाण्यास मदत होणार आहे.

मुंबईच्या नविन विकास आरखड्यानुसार वाढीव चटईक्षेत्र (एफएसआय) ८ पर्यंत वाढवण्याचे सुचविण्यात आले आहे. तसेच आरेला आरक्षणातून मुक्त करण्यात आल्यामुळे बिल्डर लोकांना मोकळे रान झाले होते. त्याला आता लगाम बसणार आहे.

दरम्यान, मुंबई शहर विकासाला चालना देण्यासाठी २०३४ पर्यंतच्या विकास आराखड्याला महापालिकेत मान्यता देण्यात आली आहे. सध्या झोपडपट्टी पुनर्विकास अंतर्गत ४ एफएसआय, मिळतो. शहरात १.३३ एफएसआय, , उपनगर टीडीआर धरुन २ एफएसआय,  तर म्हासाठी ३ एफएसआय,  देण्यात येता. आता ०.१५ पासून ८ एफएसआय,  देण्यात येणार आहे. जेथे एफएसआयची जास्त आवश्यता आहे. या ठिकाणी जादा एफएसआय देण्याची तरदूत करण्यात आली  आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.