www.24taas.com, मुंबई
एलपीजी सिलिंडर, रेशनिंग यासारख्या सरकारी सवलतींसाठी आता आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार केंद्राबाहेर लांबच लांब रांगांत ताटकळण्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. त्याचप्रमाणे आधारकार्ड नोंदवूनही घरी पोहोचले नसेल त्यांना घरबसल्या त्यांचे प्रिंटआऊट काढता येणार आहे.
‘यूआयडीएआयच्या http://uidai.gov.in या वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आधार कार्डसाठी नेमण्यात आलेल्या केंद्रांवरील मशीनची मर्यादा ही दिवसाला ३० ते ५० नोंदणीचीच आहे. यामुळे नागरिकांना पहाटे आधार केंद्राबाहेर रांगा लावाव्या लागतात.
त्यानंतरही नंबर न लागल्यास खाली हात परतून परत दुसर्या दिवशी रांग लावावी लागते. याला पर्याय म्हणून uidai.gov.in या वेबसाइटवर अपॉइंटमेंट घेता येणार आहे, अशी माहिती यूआयडीएआय’चे उपमहासंचालक अजय पांडे आणि राजेश अगरवाल यांनी दिली.