वाशी : वाशीमध्ये एक कोटींची रोकड क्राईम ब्रँचनं पकडलीये. वाशीतील सेक्टर 28मधील ही घटना आहे.
स्कोडा गाडीतून चारजण एक कोटी रुपये घेऊन चालल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एका बांधकाम व्यावसायिकाची ही रोकड असल्याची इनकम टॅक्सनं क्राईम ब्रँचला माहिती दिली.
खारघरमधील हा बांधकाम व्यवसायिक आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी घेवून जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.