मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मॅट्रीमोनी साईटचं उद्घाटन केलं. त्य़ावेळी या वेबसाईटचा आम्हाला काय उपयोग, असं मिश्किल शैलीत सांगायलाही ते विसरले नाही.
आमचं आता लग्न झालंय आणि त्यामुळं आम्हाला या वेबसाईटचा उपयोग नाही. राजकीयदृष्टा तसंही आम्ही बॅचलर आहोत. आमच्याशी कुणी युती करायला तयार होतं नाही. त्यामुळं आमचं एकला चलो रे कायम आहे.
मात्र काहीजणांना युती करायला दोन-दोनजण लागतात, असा शिवसेनेचे नाव न घेता राज ठाकरेंनी टोला लगावला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखही उपस्थित होते.