'दोस्ती बघितली, पण वाघाचा पंजा नाही बघितला'

२५ वर्ष आमची दोस्ती पाहिली, पण वाघाचा पंजा नाही बघितला, असा घणाघाती टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलतांना, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

Updated: Oct 29, 2015, 09:19 PM IST
'दोस्ती बघितली, पण वाघाचा पंजा नाही बघितला' title=

कल्याण : २५ वर्ष आमची दोस्ती पाहिली, पण वाघाचा पंजा नाही बघितला, असा घणाघाती टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलतांना, उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

'मोठे व्हा पण माजू नका, माजला तर भगवा समर्थ आहे', अनेक भगव्याच्या खाली मोठे झाले, पण माजले, माजले तर भगवा त्यासाठी समर्थ आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शत्रू तर शत्रू मित्रंही अंगावर येतात, हवेत धूर फेकणारे डबे फिरतायत, अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी मनसेला लगावली.

काळा तलाव परिसर किती बदलला पाहा, काळा तलावर परिसरात मी शिवसेनाप्रमुखांबरोबरही आलोय. काळा तलाव हा परिसर गटारीसारखाच होता, १४ वर्षांनी अनेक कामं करून काळा तलावर परिसर हा गोरा केला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

शिवसेनेने १५ वर्षात काय केलं असं म्हणणाऱ्यांना आपली मलनिस्सारणाची टाकी आहे त्यात बुडवा, म्हणजे त्यांना कळेल, असा टोलाही शिवसेनेने लगावला.

मुख्यमंत्री काल काही काही बोलून गेले, शिवसेनेने दादागिरी केली तर शिवसैनिकांना डांबले, असं म्हणून गेले, काय केलंय शिवसैनिकांनी असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केली.

कोल्हापुरात मुख्यमंत्री म्हणाले, मटकेवाल्यांना ठोकून काढा, मग मी शिवसेनेचे किती मटकेवाले कोल्हापुरात आहेत, त्याची यादी मागवली, पण कुणीच नाही, पण भाजपने ज्यांच्याशी मैत्री केलीय, तेच जास्त मटकेवाले निघाले.

भारतात नव्हे पाकिस्तानातही शिवसेनाप्रमुख्यांच्या एका वाक्याची दखल घ्यावी लागायची, त्यांचं बोट धरून तुम्ही इथं पर्यंत आलात, असाही टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

शाही फासणारे एक दोन शाईवाले तुम्हाला देशभक्त वाटत नाहीत, डोंबिवलीत तुमची सभा होती. तेथून दीड किलोमीटरवर एक व्हॅन लूटण्यात आली, ५६ लाखांची ती लूट होती, त्यांना पकडा, शिवसैनिकांना काय डांबतायत, लूटणारे तुम्हाला सापडले नसतील काय ते भाजपचे होते का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

२५ वर्ष आमची दोस्ती पाहिली, वाघाचा पंजा नाही पाहिला, असा घणाघाती टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.