उरण : सध्या सर्वत्र आंब्याचा सीझन सुरु आहे. पण सध्या चर्चेत आहे तो उरण मधील तोतापुरी आंबा तो त्याच्या लांबीमुळे...
उरण मध्ये राहणाऱ्या रितेश डाऊर यांच्या आंब्याच्या झाडाला तब्बल ३० सेंटीमीटर लांबीचा आंबा लागलाय. आसपासचे रहिवासी हा आंबा पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
हा आंबा राज्यातील सर्वात मोठ्या लांबीचा आंबा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी या आंब्याची लांबी, रुंदी आणि वजन मोजून हा आंबा तोतापुरी जातीचा असल्याची शक्यता वर्तविली आहे. आंब्याचे वजन ११०० ग्राम असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिलीय.
या आंब्याचे अधिक विश्लेषण करण्यासाठी तो कर्जत येथील कृषी विद्यापीठात पाठविण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सुमारे पाच वर्षांनंतर १० ते १२ फूट उंच वाढलेल्या या आंब्याच्या झाडाला सात आंबे लागले आहेत. यामध्ये वैशिष्ट्ये म्हणजे एकाच आंब्यांची लांबी ही इतर आंब्यांपेक्षा अधिक आहे.