अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. नेवासा जिल्हा अहमदनगर येथून अंबादास लष्करे या व्यक्तिविरोधात पारनेर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

Updated: May 15, 2016, 07:28 PM IST
अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी title=

अहमदनगर : अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. नेवासा जिल्हा अहमदनगर येथून अंबादास लष्करे या व्यक्तिविरोधात पारनेर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

गेल्या 8 महिन्यातील हे सलग 5 वे पत्र असूनही नगर पोलिसांना अद्याप पत्र लिहिणारा आरोपी सापडलेला नाही. त्यामुळे नगर पोलिसांसाठी हे एक आव्हान बनले आहे.

नेवासा येथील अंबादास लष्करे याच्या नावाने 11 महिन्यात 6 वेळा गंभीर स्वरुपाचे धमकीपत्र आलेले आहे.