गहुंजे : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर गहुंजे गावाजवळ एसटी बसला अपघात झालाय.
या अपघातात 13 जण जखमी झालेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सकाळी 10.30 च्या सुमाराला हा अपघात झाला.
बोरिवली सातारा बस ही मुंबई कडून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी गहुंजे गावाजवळ बसचा डावा टायर फुटला आणि बस लोखंडी कठडा तोडून सर्विस रोडवर गेली. या बस मध्ये सुमारे 35 ते 40 प्रवासी होते.