औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे आणि राजेश टोपे यांनी शेतकऱ्यांची देणी थकविल्याचे पुढे आलेय. ऊस उत्पादकांची थकीत रक्कम न दिल्याप्रकरणी दानवे, मुंडे, टोपे संचालक असलेल्या १६ साखर कारखान्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
यात मराठवाड्यातल्या १३ तर जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगरच्या प्रत्येकी एका साखर कारखान्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे मंत्री आणि नेत्यांच्या कारखान्यांनीच शेतक-यांची देणी थकवली आहेत.
यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंड़े, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे आणि प्रकाश सोळुंके य़ा दिग्गजांचा समावेश आहे. औरंगाबादच्या साखर सहसंचालकांनी या नोटीसा बजावल्या असून शेतक-यांची थकीत रक्कम तातडीनं अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांकडून घेण्यात आलेल्या उसाचं देणं थकवल्यान या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.