पुण्यातील राजश्री काळेंचा शिपाई ते नगसेविका असा प्रवास

सोलापूरच्या पारधी समाजाच्या राजश्री ज्ञानेश्वर काळे या आज प्रभाग ७ अ मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. भाजपच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. राजश्री काळे या राज्यातील पहिल्या पारधी समाजातील नगरसेविका ठरल्या आहेत. एक शिपाई ते नगरसेविक असा त्यांच्या प्रवास आहे. 

Updated: Feb 23, 2017, 06:01 PM IST
पुण्यातील राजश्री काळेंचा शिपाई ते नगसेविका असा प्रवास

पुणे : सोलापूरच्या पारधी समाजाच्या राजश्री ज्ञानेश्वर काळे या आज प्रभाग ७ अ मधून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. भाजपच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. राजश्री काळे या राज्यातील पहिल्या पारधी समाजातील नगरसेविका ठरल्या आहेत. एक शिपाई ते नगरसेविक असा त्यांच्या प्रवास आहे. 

गरवारे महाविद्यालयात शिपाई म्हणून राजश्री काळे काम करतात. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली. वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्या पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध काम करत होत्या. रात्रशाळेतून त्यांनी नववी पर्यंतचे शिक्षण घेतलं. राजश्री काळे या सुरुवातीपासून संघाचे काम करू लागल्या होत्या. त्यांनी राजश्री आदिवासी पारधी संस्था स्थापना केली आहे.