सावधान : राज्यात अवकाळी पाऊस; रोगांसाठी पोषक वातावरण

गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. लक्षद्वीप बेटापासून दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन-ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय. 

Updated: Nov 15, 2014, 10:36 AM IST
सावधान : राज्यात अवकाळी पाऊस; रोगांसाठी पोषक वातावरण title=

मुंबई : गेल्या 4 दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे. हे वातावरण डेंग्यूसाठी घातक आहे. लक्षद्वीप बेटापासून दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पाऊस आणि ढगाळ वातावरण आणखी दोन-ते तीन दिवस कायम राहील अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलीय. 

कोकणच्या राजाचा मोहर उडाला...
कोकणाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसानं आंबा पिकावर मात्र परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. आंबा मोहराची प्रकिया यामुळे लांबेल अशा शक्यतेनं आंबा बागायतदार धास्तावलेत. तसंच आंब्यावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याचीही शक्यताय. अनुदान देवून शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारने करावं, एकरी न देता प्रत्येक झाडामागे अनुदान द्यावे, अशी मागणी खासदार विनायक राऊतांनी केलीय. 

नाशिकमध्ये कोट्यवधींचं नुकसान...
नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी पुरता कोलमडलाय. ऑक्टोबर छाटणीसाठी उभ्या असलेल्या द्राक्षबागांचं सर्वाधिक नुकसान झालंय. कांदा, डाळिंब आणि भाताचं नुकसान झाल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. गेल्या हंगामातही असाच फटका बसल्यानं शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडलाय. 

गडचिरोलीत मलेरियाचं थैमान...
गडचिरोलीमध्ये मलेरियानं लोकांचं जगणं मुश्कील केलंय. गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ पसरलीय. विशेषतः लहान मुलांमध्ये मलेरियाचं प्रमाण जास्त आहे. गेल्या पंधरा दिवसांत जवळपास शंभर जणांना मलेरियाची लागण झालीय. मच्छरदाण्या डेल्टामेट्रिल या औषधामध्ये बुडवून लावायच्या असतात. पण धक्कादायक बाब म्हणजे डेल्टामेट्रील हे औषधच गडचिरोलीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.