पिंपरीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राजकारण तापले....

 पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडण्यात येणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडवरून राजकारण चांगलच रंगतेय... सत्ताधारी भाजपमध्ये या निवडीवरून एकमत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 9, 2017, 01:43 PM IST
पिंपरीमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राजकारण तापले.... title=

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडण्यात येणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडवरून राजकारण चांगलच रंगतेय... सत्ताधारी भाजपमध्ये या निवडीवरून एकमत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. 

एकूण ३ जागांसाठी १५० हून अधिक इच्छूक आहेत. इच्छुकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. या तीन पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी ५ वाजेपर्यंत वेळ घेतली आहे. 

पुण्यात स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून जो राडा झाला आहे. तसा प्रकार या ठिकाणी होऊ नये यासाठी भाजपमध्ये खबरदारीने पाऊले उचलली जात आहे.