मुंबई : राज्यातील पेट्रोल पंप मालकांचा सोमवारी सकाळपासून २४ तासांचा बंद आहे.
या बंदला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई आणि ठाण्यातील सीएनजी पंप मालक आपले पंप बंद ठेवणार आहेत.
डीझेल वरील व्हॅटचा दर ३ टक्क्यांनी कमी केल्यास राज्य सरकारला ६०७ कोटींचं अतिरिक्त उत्पन्न मिळू शकतं आणि जनतेला डिझेल, पेट्रोल किमान ५ रूपयांनी स्वस्त होवू शकतं.
याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्या आल्याचे फेड्रेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.