मुंबई : स्पाईसजेटची विमानं पुन्हा उड्डाण करणार असल्याचं सांगण्यात येतंय, कारण स्पाईसजेट या कंपनीला पुन्हा इंधन पुरवण्याची तयारी केल कंपन्यांनी दाखवली आहे, तसेच आपण इंधन देण्यास नकार दिला नसल्याचंही तेल कंपन्यांनी म्हटलंय. आज सकाळी एकही विमानाचे बुधवारी उड्डाण होऊ शकले नाही, कारण तेल कंपन्यांनी क्रेडीटवर इंधन पुरविण्यास नकार दिला होता.
तेल कंपन्यांनी स्पाइसजेटकडून आधीची थकबाकी रक्कम देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे स्पाइसजेटला इंधनाचा पुरवठा होऊ न शकला नाही. त्याअभावी आज एकही विमान उड्डाण घेऊ शकले नाही. आज कोणत्याही विमानाचे उड्डाण न झाल्याने स्पाइसजेट पुढील संकटात आणखी वाढ झाली होती.
कलानिधि मारन यांच्या मालकीच्या असलेल्या स्पाइसजेटला इंधनाअभावी 2000 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. स्पाईटजेटला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, तेल कंपन्यांनीच इंधन देण्यास नकार दिल्याने संकट वाढले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.