पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट सिटी योजनेच्या उद्घाटनासाठी पुण्यात दाखल झाले होते.
पुणेकर दीड मार्कांनी मागे राहिले... दीड मार्क जास्त असते तर तुम्ही भुवनेश्वरच्या पुढे गेला असता... मी पुढच्या वेळी जेव्हा येईल तेव्हा पुणे क्रमांक एकवर असायला हवं... सोबतच, देशातील नागरिकांनाही आवाहन तुम्ही पुण्यापेक्षा पुढे यायला हवं... पाहा, काय मजा येते.
- स्मार्ट पुणेकरांना माझा नमस्कार - नरेंद्र मोदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातल्या स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन
- स्मार्ट सिटीजची निवड आम्ही नाही तर नागरिकांनी केलीय.
- पंतप्रधान असेल किंवा पंचायत, देशात सर्वात स्मार्ट कोण असेल तर तो आहे देशाचा नागरिक - मोदी
- २० शहरांना स्मार्ट करण्याच्या योजनेला पुण्यातून सुरुवात
- २००० करोडच्या ८४ योजनांची सुरुवात
- पहिल्या भागात २० स्मार्टसिटी येणार आकाराला
- मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झालं...
- गरिबी पचवण्याची कुणाकडे सर्वात जास्त ताकद असेल तर ती शहरांकडे असते - मोदी
- प्रत्येकाच्या मनात एक इच्छा आहे की आपलं शहर स्मार्ट व्हावं - मोदी
- टेक्नॉलॉजी ही सामूहिक सेवेचं माध्यम बनायला हवं - मोदी
- पाण्याचा काटेकोर वापर होणं गरजेचं... आयपीएल मॅच, पाणी आणि दुष्काळावरून मोदींनी लगावला टोलाशहरीकरण ही समस्या नसून संधी आहे...
- टाकाऊतून टिकावू बनवायचं आहे... आधुनिकतेद्वारे हे सहज शक्य
- स्मार्ट सिटीज योजनेमुळे शहरांत स्वस्थ स्पर्धा वाढीस लागेल - मोदी
- जेव्हापर्यंत आपण प्रत्येक विषयाचा तुकड्यांमध्ये विचार करू तेव्हापर्यंत विकास शक्य नाही
- सायकल - पायी चालणाऱ्या लोकांसाठी अनुकूल असतील स्मार्ट सिटी
- कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या योग्य सुविधा
- २४ तास वीज आणि स्वच्छ पाणी मिळण्याची सुविधा
- वाय-फाय कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक प्रवासाच्या सुविधा