नागपूर युग चांडक हत्याकांड : दोन्ही आरोपी दोषी

येथे गाजलेल्या युग चांडक हत्याकांड प्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठवलंय.  या आरोपींना तीन फेब्रुवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे.

Updated: Jan 30, 2016, 05:39 PM IST
नागपूर युग चांडक हत्याकांड : दोन्ही आरोपी दोषी title=

नागपूर : येथे गाजलेल्या युग चांडक हत्याकांड प्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठवलंय.  या आरोपींना तीन फेब्रुवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे.

१ सप्टेंबर २०१४ ला नागपूरच्या छाप्रू नगर परिसरातील एका उच्चभ्रू परिवारातील ८ वर्षांच्या मुलाचे अपहरण आणि खून करण्यात आला होता. संपूर्ण नागपुरात खळबळ माजवणारी ही घटना नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. 

युग चांडकला त्याच्या राहत्या घरासमोरूनच २ अपहरणकर्त्यांनी पळवले होते. शहरातील नामवंत दंतचिकित्सक डॉ मुकेश चांडक यांचा तो मुलगा होता. या प्रकरणात पोलिसांनी राजेश सारवे आणि अरविंद सिंग या दोन आरोपींना अटक केली होती. दोघांनी गुन्हा कबूल केलाय.