मुंबई : आगामी नगरपालिकांमध्ये अर्ज भरू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अखेर निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय.
ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्यानं आता ऑफलाईन अर्ज भरण्यासही परवानगीन देण्यात आलीय. त्यामुळे, नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार ऑफलाईन अर्ज भरू शकतील.
पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या नगरपालिकांचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत शनिवारी दुपारी 3 वाजता संपणार आहे.