नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस निरीक्षकपदासाठी अखेर वयोमर्यादा वाढवण्याची निर्णय सरकारनं घेतलाय.
तीन वर्षांची वयोमर्यादा वाढवण्याची घोषणा सरकारनं विधानपरिषदेत केलीय. खुल्या वर्गासाठी वयोमर्यादा 28 वरून 31 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
तर मागावर्गीय आणि इतर मुलांसाठी वयोमर्यादा 31 वरून 34 पर्यंत वाढवण्यात आलीय.