कोकण रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा, एकेरीमार्गामुळे कोंडी

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे विघ्न काही केल्या संपण्याच्या मार्गावर नाही. खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे सात डब्बे घसल्याने तब्बल २५ तास वाहतूक ठप्प होती. तर त्याआधी नव्याने सुरु झालेली डबल डेकर ट्रेन रोह्याजवळ मध्य आणि कोरेच्या वादामुळे एकतास उभी करण्यात आली होती. आता तर अनेक गाड्या जादा गाड्या सोडल्यामुळे एकेरीमार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा झालाय.

Updated: Aug 26, 2014, 02:27 PM IST
कोकण रेल्वेचा प्रवास कंटाळवाणा, एकेरीमार्गामुळे कोंडी title=

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासाचे विघ्न काही केल्या संपण्याच्या मार्गावर नाही. खेडजवळील करंजाडी येथे मालगाडीचे सात डब्बे घसल्याने तब्बल २५ तास वाहतूक ठप्प होती. तर त्याआधी नव्याने सुरु झालेली डबल डेकर ट्रेन रोह्याजवळ मध्य आणि कोरेच्या वादामुळे एकतास उभी करण्यात आली होती. आता तर अनेक गाड्या जादा गाड्या सोडल्यामुळे एकेरीमार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना हा प्रवास नकोसा झालाय.

करंजाडीजवळ मालगाडीचे डब्बे घसरल्याने खंडित झालेली कोकण रेल्वे सेवा पुन्हा एकदा रुळावर आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश तब्बल २५ तासांनी आले. रविवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास मालगाडीचे सात डब्बे घसरल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झाली होती. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाडय़ा ठिकठिकाणी अडकून पडल्या होत्या, तर काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या.

आजही दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर गाडी रोह्याजवळ जवळपास एकतास थांबवून ठेवण्यात आली होती. तर रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर दिव्यापर्यंत अनेकवेळा चालवली जाते. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होतात. काहींना तिकिट काढूनही प्रवास करता येत नाही. आयत्यावेळी उद्घोषणा करण्यात येत असल्याने प्रवाशांना दादरहून दिवा किंवा पनवेल असा प्रवास करावा लागतो. तिकिट काढून पुन्हा लोकलच्या तिकिटाचा भार प्रवाशांना सोसावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर अनेक जलद गाड्या सुरु आहेत. त्यामुळे पॅसेंजर गाड्यांना थांबवून त्या गाड्या पुढे रेटल्या जातात. याचा परिणाम एकाच ठिकाणी गाडी एक तास ते दीडतास जागेवर थांबवून ठेवली जाते. असचा प्रकार आज रोह्यात घडला. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. तसेच १८ ऑगस्टला जनशताब्दी एक्सप्रेसचे इंजिन करंजाडीजवळ बिघड्याल्याने रत्नागिरी-दादर पॅसेंजर दीडतास करंजाडी येथे थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास प्रवाशांना नकोसा वाटत आहे. तशी प्रतिक्रिया प्रवाशी व्यक्त करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.