इंदापूर : 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये येणार होते, असा गौप्यस्फोट भाजप नेते विनोद तावडे यांनी केला आहे. हर्षवर्धन पाटलांचा भाजप प्रवेश मी मुख्यमंत्र्यांना सांगून रोखला असल्याचंही विनोद तावडे म्हणाले.
विनोद तावडे इंदापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भिगवणमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत हा दावा केला आहे.