सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळणार?

सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्त मार्क द्यायचा विचार उच्च शिक्षण मंत्रालय करत असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली आहे. 

Updated: Jan 2, 2017, 07:48 PM IST
सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळणार? title=

मुंबई : सीएनजी स्कूटर वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये जास्त मार्क द्यायचा विचार उच्च शिक्षण मंत्रालय करत असल्याची प्रतिक्रिया शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी दिली आहे. पर्यावरणाचा समोतल राखण्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्बन क्रेडिटच्या स्वरूपात हे मार्क दिले जाऊ शकतात, असं तावडे म्हणाले आहेत. 

मुंबईमध्ये सीएनजी स्कूटरचं उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी विनोद तावडे बोलत होते. या कार्य्रक्रमाला तावडेंबरोबर पेट्रोलियम मंत्री धम्रेंद प्रधान आणि भाजप खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या.