वसई : वसई विरार परिसरात एम् डी ड्रग्स वितरित करणाऱ्या मुख्य डिलरला पोलिसांनी अटक केली आहे. राजवीर उर्फ़ पापे असं त्याचं नाव असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस त्याच्या शोधत होते.
गेल्या सहा महिन्यापासूनन या पापेने वसई विरार परिसरात एम डी ड्रग्सची तरुणांना सवय लावली होती.वसईतल्या एंटी ड्रग ब्रिगेडच्या मदतीने पोलिसांनी दोघाना अटक केली आहे.
पापे हा वसई विरार परिसरातला हा मुख्य विक्रेता होता. गेल्या महीना भरापासून तो फरार देखील होता.वसईच्या माणिकपुर पोलिसांनी नालासोपार्याच्या फेन फिएस्टा थियेटर जवळून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती वरुण ऑक्टोबर् 2014 पासून आक तगायत पापे आणि त्याचे साथीदार हे एम् डी ड्रग्स विकत होते. या ड्रग्स ची नाशा केल्यास व्यक्तीला दिवसभर गूंगी येते आणि अति सेवनाने जीवितस देखील धोखा उद्भवतो.
स्वत:ला आर्थिक फायदा मिळवण्यासाठी शाळा कॉलेजमधील तरुणांना आधी हे मोफत हे ड्रग्स देत होते आणि या ड्रग्सची लागन लगल्यावर तरुण या ड्रग्सच्या आहारी जात होते . गेल्या सहा महिन्यात अनेक लोक हे ड्रग्सच्या आहारी गेले होते.
वसईत स्थापन झालेल्या एंटी ड्रग्स ब्रिगेडच्या मदतीने पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. राजवीर उर्फ़ पापे सविंदर सिंग आणि किरण गुप्ता अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.
या माध्यमातून पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या मुलाना या ड्रग्सच्या पासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.