नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आता पुन्हा एकदा काही काळासाठी तुरुंगाबाहेर येणार आहे. 'कुटुंबाला भेटण्यासाठी' तो आता बाहेर येणार आहे. मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
गेल्याच वर्षी आपल्या मुलाच्या लग्नासाठी तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्या आईच्या तब्येतीचे कारण देऊनही तो बाहेर आला होता. हा पॅरोल त्याने वाढवून घेतला होता.
आता यंदा त्याने फर्लोसाठी अर्ज केला तेव्हा मात्र तुरुंग अधिक्षकांनी त्याला ही रजा नाकारली होती. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आणि ही सुट्टी मागितली होती. आता नागपूर खंडपीठाने त्याला ही रजा मंजूर केला आहे. आता २८ दिवसांसाठी तो बाहेर येणार आहे.