सांगलीत राष्ट्रवादीला खिंडार; आबांचे समर्थक सेनेत

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल बाबर यांनी आज सांगलीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय.

Updated: Aug 22, 2014, 02:29 PM IST
सांगलीत राष्ट्रवादीला खिंडार; आबांचे समर्थक सेनेत title=

सांगली : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल बाबर यांनी आज सांगलीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनिल बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. बाबर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीला सांगलीत खिंडार पडलंय.

बाबर हे आर.आर.पाटील यांचे समर्थक होते. अनिल बाबर हे यापूर्वी खानापूर - आटपाडी मतदार संघातून दोन वेळा निवडून आलेत. 

मंत्र्यानी स्वत:च्या मतदार संघांपुरतीच कामं केली असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. तसंच सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचं अनिल बाबर यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.