आता, द्यावा लागेल मद्यविक्रीचा दररोजचा हिशोब

निवडणूक काळात पैसे, दारुविक्रीवर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. निवडणुकीत पैसे, दारुचा मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं निदर्शनास येत असल्यामुळे निवडणूक आयोगानं यासंदर्भातले कायदे अधिकच कडक केलेत.

Updated: Sep 19, 2014, 04:23 PM IST
आता, द्यावा लागेल मद्यविक्रीचा दररोजचा हिशोब title=

नागपूर : निवडणूक काळात पैसे, दारुविक्रीवर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. निवडणुकीत पैसे, दारुचा मतं मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचं निदर्शनास येत असल्यामुळे निवडणूक आयोगानं यासंदर्भातले कायदे अधिकच कडक केलेत.

उत्पादन शुल्क विभागाला निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार दारु निर्मिती कारखान्याबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर दारु विक्रीचा दररोजचा हिशेब देणं, तसंच निवडणुकीच्या काळात दारु विक्रीत मोठी वाढ झाली तर याचीही कारणं विक्रेत्यांना कारणं द्यावी लागणार आहेत, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक मोहन वर्दे यांनी दिलीय.  

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून उत्पादन शुल्क विभागानं कारवाई करत आत्तापर्यंत एकूण ४५ हजार रुपयांची दारू जप्त केलीय. तसंच आंतरराज्य सीमेवरही उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे. 

निवडणूक आयोगानं घातलेल्या निर्बंधाचं दारु विक्रेत्यांनी स्वागत केलंय.   
एवढे निर्बंध लादल्यानंतरही पैशांचा पाण्यासारखा वापर आणि दारुचे पाट वाहतात की या आदेशांचं कितपत पालन होतं हे येत्या काही दिवसात समोर येईलच. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.