रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.
गुहागर समुद्राला आज भरती होती मात्र अचानक भरतीचं पाणी कमी होत गेलं त्यामुळे पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे सात जण पाण्याच्या प्रवाहात सापडले. बुडालेल्यांपैंकी मारिया चँदा आणि जोया शेख या दोघांचा मृतदेह हाती लागलाय.
तर बाज़ुद्दीन शेख, शहबाज शेख, महमद शेख, सुफियान शेख, हिना चाँद यांचा शोध गुहागर पोलीस आणि स्थानिक नागरिक घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.