मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप-सेनेची पुन्हा युती होण्याचे संकेत दिले आहेत. आता शिवसेना-भाजपमध्ये मंत्रिपदाच्या वाटाघाटीची चर्चा सुरू आहे.
शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदासह १० मंत्रिपदं हवी आहेत. म्हणजेत भाजप-शिवसेना २:१ असा रेशो शिवसेनेला हवाय. भाजपच्या प्रत्येक दोन मंत्र्यांमागे शिवसेनेचा एक मंत्री, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पुढाकारानं दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. देवेंद्र यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट आणि राज्य असे दोन्ही मिळून ३२ मंत्री असतील. त्यापैकी २० भाजपच्या वाट्याला १० शिवसेनेला आणि उर्वरित दोन मित्रपक्षांना देण्याबाबत चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. तर उपमुख्यमंत्री पदाची मागणी शिवसेनेनं केल्याचं कळतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.