www.24taas.com, लंडन
मुखावाटे सेक्स केल्यामुळे तोंडाचा कँसर होऊ शकतो. गेल्या वर्षी ब्रिटनमधील ६००० लोकांना मुखावाटे सेक्स केल्यामुळे तोंडाचा कँसर झाल्याचं समोर आलं आहे.
२००१मध्ये तोंडाच्या कँसरचे रुग्ण ४,४०० होते. हिच संख्या वाढून ६,२०० पर्यंत गेली आहे. म्हणजेच दशकभरात या गोष्टीचे प्रमाण वाढले आहे. यातील दोन तृतयांश पुरूष आहेत. पूर्वी तोंडाच्या कँसरला धूम्रपान आणि मद्यपान एवढ्याच गोष्टी जबाबदार असाव्यात असं वाटत होतं.
पण, या अचानक मोठ्या प्रमाणावर तोंडाच्या कँसरचं वाढलेलं प्रमाण पाहून जेव्हा डॉक्टरांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांना HPV या व्हायरसचा शोध लागला. HPV म्हणजेच ह्युमन पॅपीलॉमा व्हायरस नामक हा व्हायरस सेक्सवाटे पसरतो. डोकं आणि मानेच्या ट्यूमरचे तज्ज्ञ असणाऱ्या रिचर्ड शॉ या ब्रिटिश डॉक्टरांनी सांगितलं, की HPV मुळे तोंडाचा कँसर झालेल्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. हे लोक वयाने तरूण आणि धूम्रपान न करणारे होते.