मुंबई : 'हिट अॅन्ड रन' प्रकरणी सलमान खानला सेशन्स कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टानं आता स्थगिती दिलीय. शिवाय सलमान खानला जामीनही मंजूर झालाय. सलमान खान प्रकरणात आणखी काय घडामोडी होऊ शकतात... पाहुयात...
तब्बल १३ वर्षांनी हिट अँड रन प्रकरणाचा निकाल लागला... ६ मे रोजी सलमान खानला मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली. आणि अवघ्या चार तासात मुंबई हायकोर्टानं अंतरिम जामीन देखील दिला. शुक्रवारचा दिवसही सलमानसाठी लकी ठरला... मुंबई हायकोर्टानं ३० हजाराच्या जातमुचलक्यावर सलमानला जामीन मंजूर केला. एवढंच नाही तर त्याच्या शिक्षेला हायकोर्टानं स्थगितीही दिली. त्यामुळं सलमानची जेलवारी तूर्तास टळलीय.
आता सलमान खानचं पुढं काय होणार ते पाहूयात...
- १५ जून रोजी सलमान खानच्या अर्जावर सुनावणीची तारीख निश्चित होणार
- १५ जुलैपर्यंत या अर्जावर अंतिम सुनावणी होणार
- १५ जुलैपेक्षाही जास्त वेळ या सुनावणीसाठी लागू शकतो
- हायकोर्टानं सलमानवरील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रद्द केला तर, त्याची शिक्षा कमी होईल
- शिक्षा कमी झाल्यास तो पुन्हा हायकोर्टात शिक्षेचं रुपांतर दंडामध्ये करावं, अशी मागणी करेल
- हायकोर्टानं त्याची ही मागणी फेटळली तर सलमान खान सुप्रीम कोर्टात अपील करेल
- सुप्रीम कोर्टातही सलमान खानला दिलासा न मिळाल्यास तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करु शकतो
- आणि राष्ट्रपती जो निकाल देतील त्यावर सलमान खान जेलमध्ये जाणार का, हे स्पष्ट होईल
यापूर्वी सिने अभिनेता संजय दत्तच्या बाबतीत हे सगळं घडलंय. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी संजय दत्तने सुरूवातीला १८ महिने अंडा सेलमध्ये काढले आणि नंतर तो जामिनावर बाहेर आला. तो थेट त्याच्या शिक्षेचा पुनर्विचार अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळेपर्यंत... म्हणजे तब्बल २० वर्षे संजूबाबा जामिनावर होता.
त्यामुळे सलमान खान किती दिवस जेल बाहेर राहणार की, तो जेलमध्ये जाणारच नाही, हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.