अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

PTI | Updated: Nov 11, 2014, 07:33 PM IST
अभिनेत्री तनुजा यांना रुग्णालयातून सुट्टी title=

मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना सोमवारी रात्री श्वास घ्यायला त्रास होत असल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

अभिनेत्री तनुजा यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने ऑक्सिजन वर ठेवण्यात आले होते.मात्र आता त्या नॉर्मल असल्याचं बेले वुई क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.टंडन यांनी सांगितलं. तनुजा कोलकाता आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या रात्री जेवणाच्या समारंभात सहभागी झाल्या होत्या मात्र तिथेच त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या समारंभात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.