मुंबई : बॉलिवूड स्टार सलमान खान आणि कपिल शर्मा एक चांगले मित्र तर आहेत. पण कपिल आणि सुनील ग्रोवर यांच्यामध्ये झाल्याल्या भांडणावर सलमान खानने कपिलला सल्ला दिला आहे. कपिलने आपल्या स्टारडमवर नियंत्रण ठेवावे असं सलमान खानने म्हटलं आहे.
कपिलच्या चुकीच्या वागणुकीमुळे एकानंतर एक त्याचे सर्व सहकारी त्याचा शो सोडून जाणार असल्याच्या चर्चा आहेत. सलमान खानने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल शर्माबाबत जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सलमानने म्हटलं की, "आपल्या स्टारडमला नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मी माझ्या करिअरमध्ये आज ज्यापण जागी आहे तेथे लोकं नेहमी तुमच्या हा मध्ये हा मिळवतात. पण अशा वेळेस कळत नाही की आपण चुकीचं आहोत की बरोबर. त्यासाठी मी माझं कुटुंब आणि मित्रांचं ऐकतो. कारण ते लोकं मला जमिनीवर ठेवतात. हवते उडू नाही देत.'
सलमानने पुढे म्हटलं की, 'तो असा व्यक्ती आहे जो छोट्या छोट्या गोष्टींमुळे नाराज होऊन जातो. पण त्याला आपल्या कुटुंबाकडून सल्ला घेतला पाहिजे. की काय चूक आहे आणि काय बरोबर.'