राणानं वाढवली 'बाहुबली: द कनक्ल्युजन'ची उत्सुकता

'बाहुबली: द बिगीनिंग' या चित्रपटाचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्ल्युजन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

Updated: Oct 7, 2016, 08:42 PM IST
राणानं वाढवली 'बाहुबली: द कनक्ल्युजन'ची उत्सुकता title=

मुंबई : 'बाहुबली: द बिगीनिंग' या चित्रपटाचा दुसरा भाग 'बाहुबली: द कनक्ल्युजन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

या चित्रपटासाठी सर्वच कलाकार फार मेहनत घेताना दिसताय. अभिनेता राणा डग्गुबतीने नुकताच त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये राणा अफलातून लूकमध्ये दिसत आहे. 

बाहुबली चित्रपटाच्या पुढील भागासाठी राणाने त्याच्या शरीरावर बरीच मेहेनत घेतली आहे. प्रभासच्या रुपातील बाहुबलीला चित्रपटाच्या पुढील भागात पुरेशी टक्कर देण्यासाठी राणा डग्गुबतीने चांगलाच घाम गाळला आहे.

राणाने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये त्याचा ट्रेनरही दिसत आहे. त्यामुळे राणाचा हा दमदार लूक अनेकांचे लक्ष वेधतोय.