प्रभासला दिला बाहुबली 3 मधून डच्चू

भारतातील सर्वाधिक चर्चेचा आणि सुपरडुपर हिट ठरलेला सिनेमा म्हणजे 'बाहुबली'या चित्रपटांने सर्वात अधिक कमाई करून भारतात एक रिकार्ड केला होता. या चित्रपटांचा दुसरा भाग कधी येणार यांची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. अशातच बाहुबलीचा तिसरा भाग बनवण्यात येणार असल्याचे कळले आहे. मात्र तिसऱ्या भागात प्रभासला डच्चू देण्यात येऊ शकतो.

Updated: Dec 8, 2015, 07:18 PM IST
प्रभासला दिला बाहुबली 3 मधून डच्चू title=

मुंबई : भारतातील सर्वाधिक चर्चेचा आणि सुपरडुपर हिट ठरलेला सिनेमा म्हणजे 'बाहुबली'या चित्रपटांने सर्वात अधिक कमाई करून भारतात एक रिकार्ड केला होता. या चित्रपटांचा दुसरा भाग कधी येणार यांची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. अशातच बाहुबलीचा तिसरा भाग बनवण्यात येणार असल्याचे कळले आहे. मात्र तिसऱ्या भागात प्रभासला डच्चू देण्यात येऊ शकतो.

बाहुबली या चित्रपटांने दाक्षिणात्य चित्रपटांतील अभिनेता प्रभासला खूप  प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र यांच चित्रपटांच्या तिसऱ्या भागात प्रभास नसू शकतो. कारण बाहुबली चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी बाहुबलीच्या तिसऱ्या भागाचे लिखाण सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या कथानकाच्या विषयी दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की प्रभासला तिसऱ्या भागात स्थान नसेल. तसेच कटप्पाचे पात्र ही नसेल.

बाहुबलीच्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे 'बाहुबली : द कनक्ल्यूजन'चे शुटींग सुरू असून २०१६ च्या उत्तरार्धात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.