मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीविरोधात बिग बॉस सिझन 5 ची स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्रानं अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. सनीनं माझी बदनामी केली आहे, त्यामुळे तिनं मला 100 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी पूजा मिश्रानं केली आहे.
माझ्या लोकप्रियतेमुळे सनी लिओनीला त्रास झाला आणि तिनं प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याविरोधात वक्तव्य केलं. यामुळे माझं 70 लाख रुपयांचं नुकसान झालं असा दावा पूजा मिश्रानं केला आहे.
कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यानंतर या याचिकेबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.