अजित मांढरे झी मीडीया, मुंबई : ठाण्यात पकडले गेले २ हजार कोटीचे अंमली पदार्थ आणि देशात अंमली पदार्थांचा काळाबाजार किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. एवढचं नाही तर या निमित्ताने बॉलिवूड, अंमली पदार्थ तस्करी आणि अंडरवर्ल्ड यांच साटलोट पुन्हा एकदा समोर आलय ते ममता कुलकर्णीच्या रुपाने ... कसं ते पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मध्ये ...
ममता कुलकर्णी ... १९९२ साली बॉलिवूड करीअरला सुरुवात करणारी ममता कुलकर्णी ख-या अर्थाने प्रकाश झोतात आली ती या आयटम साँगने ... त्यानंतर हीने मागे वळून पाहिले नाही ... सबसे बडा खिलाडी, करन अर्जून आणि चायना गेट असा सिनेमात ममता नावाजली गेली...
पण चायना गेट या चित्रपटात ममता कुलकर्णीला जो रोल मिळाला त्यामागे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हात असल्याचं समोर आलं आणि ममताचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले ...
चायना गेट या सिनेमात ममताला रोल मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली ती अंमली पदार्थ तस्कर विकी गोस्वामी याने ... यामुळे ममतेचे अंडरवर्ल्ड कनेक्शन किती घनिष्ठ आहेत हे सिद्ध झाले ...
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास विकी गोस्वामी हा जगातील सर्वात मोठा ड्रग डीलर... बॉलिवूड मध्ये पैसा गुंतवणं... हिरो हिरॉईनला दुबईत पार्टी देणे ही विकिची ओळख... पण साल २००० साली मुंबई पोलीसांनी विकीच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ममता कुलकर्णीची चौकशी केली आणि ममताला आणखी एक नवा चेहरा समोर आला...
अचानक २००२ साली ममता कुलकर्णी गायब झाली आणि थेट वर्षभराने ती दुबईला असल्याची माहिती समोर ... अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी दुबईच्या जेलमध्ये आपला बॉयफ्रेंड विकी याला सोडवण्याकरता ममता दुबईला गेली होती. त्यानंतर विकी ने ममतासाठी अन्न पाणी सोडल्याची घटना समोर आली .. तेव्हा पासून ममताने ग्लॅमरवर पाणी सोडलं आणि गगनगिरी महाराजांच्या अध्यात्माची दीक्षा घेवून बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी झाली योगिनी... हे सर्व करत होती विकीच्या सुटकेसाठी...
२०१२ साली विकी ची सुटका झाल्यानंतर ममता विकी सोबत केनियाला स्थायिक झाली ... पण अचानक २०१४ साली अशी घटना घडली ज्यामुळे ममता आणि विकीचे कारनामे पुन्हा एकदा जगासमोर आले ...
२०१४ साली अमेरिका आणि केनिया पोलीसांच्या एन्टी ड्रग युनिटने कारवाई करुन विकीच्या केनिया येथील घरातून अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी विकी गोस्वामी, केनियाचा ड्रग माफिया बराकत अकाशासह त्याचा छोटा भाऊ आणि पाकिस्तानचा ड्रग माफिया गुलाम हुसैन यांना अटक केली. त्यावेळी ममताला देखील चौकशी करता ताब्यात घेण्यात आले होते....
ममताकडून विशेष काही माहिती न मिळाल्याने केनिया पोलीसांनी ममता कुलकर्णीला सोडून दिले होते ... त्यानंतर काही महिन्यांनी विकीला ही केनिया पोलीसांनी सोडले... पुढील वर्षभर विकी गोस्वामी अंडरग्राऊंड झाला ... आणि अचानक गेल्या आठवड्यात ... ठाणे पोलीसांनी २ हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थ जप्ती प्रकरणी केलेल्या कारवाईत विकी गोस्वामीचे नाव समोर आले ... एवढचं नाही तर ममता कुलकर्णीचा देखील या २ हजार कोटींच्या अंमली पदार्थ प्रकरणात सहभाग असल्याचा दुजोरा ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिलाय ...
आता या २ हजार कोटी अंमली पदार्थ प्रकरणी विकीला भारतात आणण्याकरता ठाणे पोलीसांनी हालचाल सुरु केलीये. विकीला भारतात आणताच... त्याच्या मागे ममता कुलकर्णी ही आणले जाईल... तेव्हा एक बॉलिवूड अभिनेत्री ते योगिनी आणि योगिनी ते अंमली पदार्थ तस्कर म्हणुन ममताचा रोल ही जगासमोर येईल ...