मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 'स्लो पॉयझन' देण्यात आलं होतं... ही गोष्टीचा खुलासा खुद्द लता मंगेशकर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना केलाय.
१९६२ साली लता मंगेशकर या खूपच आजारी होत्या. तीन महिने त्या अंथरुणाला खिळून राहिल्या होत्या. यामुळेच त्या काळात त्या गाऊही शकल्या नाहीत. याचबद्दल त्यांना जेव्हा 'स्लो पॉयझन' देण्यात आलं होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या शक्यतेला दुजोरा दिला.
'असं काहीतरी घडलं होतं... किंवा माहीत नाही काही तरी झालं होतं, देव जाणे... पण मी खूपच आजारी पडले होते आणि तीन महिन्यांपर्यंत मला गाणंही म्हणता आलं नव्हतं' असं लतादीदींनी म्हटलंय.
यावेळी, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही वक्तव्य केलंय. राजनीतीबद्दल मला काही माहित नाही पण, नरेंद्र मोदी एक चांगले व्यक्ती आहेत हे मला माहित आहे. ते आपल्या देशावर खूप प्रेम करतात.... आणि देशाच्या भल्यासाठी ते चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, असंही लतादीदींनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.