मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने 'पुरस्कार वापसी'चे समर्थन करून देशातील 'असुरक्षित' वातावरणावर चिंता व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंतीत असलेली त्यांची पत्नी देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे आमिरने सांगितले.
आमिर खान याने हे प्रतिष्ठीत रामनाथ गोयंका पुरस्कार वितरण सोहळ्यात दरम्यान म्हटले आहे. आमिर म्हणाला, किरणने मला देश सोडण्यासंदर्भात बोलले होते. ती आपल्या मुलांसंदर्भात चिंतीत आहे.
आमिर म्हणाला, मी प्रत्येक अहिंसक विरोधाचे समर्थन करतो. प्रत्येकाला आपला विरोध मांडण्याचा अधिकार आहे. पण विरोध हा हिंसक नसावा.
आमिर खान म्हणाला दहशतवादाला धर्माशी जोडले नाही पाहिजे. हिसेंची कोणतीही घटना पाहिल्यावर तुम्ही त्या व्यक्तीला दहशतवादी मानता. त्याला धर्माचा टॅग लावला जातो. तो म्हणाला दहशतवाद्याचा कोणताही धर्म नसतो.
मी कोणाचे प्रतिनिधीत्व करत असे तर सर्वांचे करतो आहे. फक्त मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे मानले नाही पाहिजे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.