अक्षयला करायचंय प्रियंकासोबत काम

Updated: Jun 25, 2014, 06:18 PM IST
अक्षयला करायचंय प्रियंकासोबत काम

मुंबईः बॉलिवूडमधील आघाडीचा खिलाडी अक्षय कुमारला देसी गर्ल प्रियंका चोप्रासोबत काम करायची इच्छा आहे. अक्षय आणि प्रियंकाने 'अंदाज', 'वक्त', 'ऐतराज' आणि  'मुझसे शादी करोगी' असे सुपरहीट सिनेमे दिले आहेत. तसेच या जोडीला प्रेषकांनीही पसंती दिली होती. 

अक्षयने चार ते पाच सिनेमे वगळता आतापर्यंत काम केलेले नाही.मात्र आता चर्चा आहे की, अक्षय कुमारला पुन्हा प्रियंकासोबत काम करायचे आहे. अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट 'सिंग इज ब्लिंग'वर काम करत आहे या फिल्मसाठी त्याने प्रियंकाही भेट घेतली आहे. जर काही सगळे ठिक झालं, तर अक्षय-प्रियंकाची सुपरहिट जोडी सिल्व्हर स्क्रिनवर पुन्हा एकदा जलवा पाहायला मिळेल. 

नव्याने दिग्दर्शक झालेला प्रभुदेवाच्या 'सिंग इज ब्लिंग' या सिनेमात ही शक्यतो पाहायला मिळेल.दरम्यान अक्षय कुमार आणि अश्विनी यार्डी हे दोघे मिळून एकत्रितपणे फिल्मची निर्मिती करत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.