बॉलिवूडचा 'हरामखोर' वादात

बॉलिवूड चित्रपटांचं वादाशी नातं तसं जुनंच... असाच एक येऊ घातलेल्या 'हरामखोर' या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झालाय. या चित्रपटाच्या पोस्टरसाठी चक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या म्हणजे बालभारतीच्या बोधचिन्हाचा वापर करण्यात आलाय. 

Updated: Apr 7, 2015, 01:53 PM IST
बॉलिवूडचा 'हरामखोर' वादात title=

मुंबई: बॉलिवूड चित्रपटांचं वादाशी नातं तसं जुनंच... असाच एक येऊ घातलेल्या 'हरामखोर' या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झालाय. या चित्रपटाच्या पोस्टरसाठी चक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या म्हणजे बालभारतीच्या बोधचिन्हाचा वापर करण्यात आलाय. 

श्लोक शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून सध्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट फेस्टिव्हलमध्ये या चित्रपचटाचं प्रिमिअर दाखवण्यात येत आहेत. आपल्या भन्नाट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या नवाजउद्दीन सिद्दीकीनं या चित्रपटात एका शिक्षकाची भूमिका केली आहे. तर अभिनेत्री श्वेता त्रिपाठी विद्यार्थिनीच्या भूमिकेत आहे. 

शिक्षक विद्यार्थिनीच्या प्रेमप्रकरणावर हा चित्रपट आधारित आहे. या वादग्रस्त पोस्टरविरोधात बालभारतीनं कायदेशीर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती  बालभारतीचे संचालक सी आर बोरकर यांनी झी मीडियाला दिलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.