'पिंगा'चं मेकिंग | दीपिकाचा प्रियांकावर असाही 'वार'

संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यावर सुरूवातीपासून वाद सुरू आहेत. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. 

Updated: Dec 2, 2015, 05:01 PM IST
'पिंगा'चं मेकिंग | दीपिकाचा प्रियांकावर असाही 'वार' title=

मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील पिंगा गाण्यावर सुरूवातीपासून वाद सुरू आहेत. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. 

(व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा)

अर्थातच या सिनेमात दीपिका पदुकोण ही मस्तानीच्या तर प्रियांका ही काशीबाईच्या भूमिकेत आहे, या दोन्ही सवत असल्या, तरी या एकमेकांच्या किती लाडक्या होत्या, हे पिंगा गाण्याच्या मेकिंग व्हिडीओत दिसून येत आहे.

या व्हिडीओत दीपिका आणि प्रियांकाची धमाल मस्ती तुम्हाला दिसणार आहे. प्रियांकावर दीपिकाने कंगव्याचा कसा वार केला आहे, हे देखील या व्हिडीओत तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.